100+ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश मराठी: Bhim Jayanti Wishes, Quotes & Status in Marathi

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समता, बंधुता आणि न्यायाचे प्रणेते, महामानव, ज्ञानसूर्य, भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (भीम जयंती) दरवर्षी १४ एप्रिल रोजी जगभरात मोठ्या उत्साहाने आणि आदराने साजरी केली जाते. दिनदुबळ्यांना, शोषितांना जगण्याचा स्वाभिमान आणि शिक्षणाची नवी दिशा देणाऱ्या या युगपुरुषाच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी येथे सादर करत आहोत 100+ Best Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes, Quotes, Status & Messages in Marathi (भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा). हे प्रेरणादायी विचार आणि आकर्षक इमेजेस तुम्ही WhatsApp स्टेटस, Facebook आणि Instagram वर सहज शेअर करू शकता.

💡 वाचनाची शिफारस: इंग्रजीमध्ये शुभेच्छा वाचण्यासाठी आमचा विशेष लेख पहा: Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in English तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार (Quotes in Marathi).

अनुक्रमणिका (Table of Contents)


भीम जयंतीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा (Bhim Jayanti Wishes)

सजली अवघी नगरी पाहण्या तुमची कीर्ती डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
आतुरता फक्त आगमनाची – जयंती माझ्या बाबांची!

सजली अवघी सृष्टी पाहण्या तुमची कीर्ती,
तुम्ही येणार म्हटल्याने नसानसांत भरली स्फूर्ती…
आतुरता फक्त आगमनाची, जयंती माझ्या भीमाची!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!

स्वाभिमानाची आग आहे तू भीमाचा वाघ आहेस स्टेटस इमेज
स्वाभिमानाची आग आणि भीमाची शिकवण

निळ्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे…
घाबरू नकोस संघर्षाला, तू भीमाचा वाघ आहेस!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

१४ एप्रिल १८९१ ला सोनियाची उगवली सकाळ भीम जयंती ग्रीटिंग
१४ एप्रिल – सोनियाची उगवली सकाळ

१४ एप्रिल १८९१ ला सोनियाची उगवली सकाळ,
महुच्या पावन भूमीवर जन्मास आले भीम बाळ…
सर्वांना भीम जयंतीच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा!

सागराचे पाणी कधी आटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही कोट्स
अथांग सागरासारखे अथांग विचार

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
माझ्या भीमाची आठवण कधी मिटणार नाही…
अरे एकच जन्म काय हजार जन्म जरी घेतले,
तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाहीत!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


संविधान निर्मात्यास कोटी कोटी विनम्र अभिवादन (Tribute to Babasaheb)

युगपुरुष बोधिसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती अभिवादन
करोडो मनांवर अधिराज्य गाजवणारे महामानव

जगातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने आणि अथांग ज्ञानाने राज्य केले… अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस त्रिवार वंदन!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर विनम्र अभिवादन इमेज
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार – विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!

मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची शिकवली व्याख्या माणुसकीची
माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव

मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची,
तुम्ही जगाला शिकवली खरी व्याख्या माणुसकीची…
तुम्ही देव नव्हता, तुम्ही देवदूतही नव्हता,
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव होता!
भीम जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


स्वाभिमानी विचार आणि प्रेरणादायी चारोळ्या (Inspirational Charolya)

माझ्या बाबासाहेबांचे काम एवढे मोठे त्यांच्यापुढे वाटतात चंद्र सूर्य ही छोटे
अथांग कर्तृत्व आणि ज्ञानाचा प्रकाश

माझ्या बाबासाहेबांचे कार्य एवढे उत्तुंग आणि मोठे,
त्यांच्या अलौकिक ज्ञानापुढे वाटतात चंद्र-सूर्यही छोटे!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला समतेचा अधिकार मिळाला कोट्स
संविधानरूपी समतेचा अधिकार देणारे युगपुरुष

ज्यांच्यामुळे लाखो घरांचा खरा उद्धार झाला,
दीन-दुबळ्यांना समाजात स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी-कोटी अभिवादन त्या महामानवाला,
ज्यांनी संविधानरूपी समता आणि बंधुतेचा अधिकार दिला!
जय भीम!

विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती
विश्वरत्न, क्रांतिसूर्य, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, महाविद्वान,
अर्थतज्ज्ञ, महान इतिहासकार, संविधान निर्माते,
क्रांतिसूर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधिसत्व, महामानव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन जयंतीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम!

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल विशेष शुभेच्छा फोटो
१४ एप्रिल – विश्व ज्ञान दिवस आणि समता पर्व

व्हॉट्सॲप आणि फेसबुकसाठी भीम जयंती स्टेटस (WhatsApp Status)

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!” हा मूलमंत्र देणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन! 💙 जय भीम!

वादळालाही नमवणारी ज्यांची जिद्द होती, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी ज्यांची लेखणी होती… अशा माझ्या बाबासाहेबांना त्रिवार वंदन!

गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून दिली तर तो बंड करून उठेल… समतेची मशाल पेटवणाऱ्या ज्ञानसूर्याला मानाचा मुजरा! १४ एप्रिल भीम जयंतीच्या शुभेच्छा!

राजे अनेक झाले पण ज्यांनी एका लेखणीने कोट्यवधी दीनदुबळ्यांचे भाग्य बदलले, ते एकमेव राजे म्हणजे ‘बाबासाहेब आंबेडकर’! जय भारत! जय भीम!


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती केव्हा साजरी केली जाते?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतभर आणि जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला होता. हा दिवस ‘समता दिन’ आणि ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

बाबासाहेबांचा सर्वात प्रसिद्ध व प्रेरणादायी संदेश कोणता?

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!” हा बाबासाहेबांनी दिलेला वैश्विक संदेश आजही प्रत्येक पिढीला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि स्वतःचे स्थान निर्माण करण्याची प्रेरणा देतो.


हे देखील नक्की वाचा:
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनमोल विचार (Ambedkar Quotes in Marathi)
👉 Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in English
👉 मराठी स्टेटस संग्रह (Marathi Status on Life & Relations)


निष्कर्ष (Conclusion): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ एका विशिष्ट समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीला समता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखवणारे दीपस्तंभ आहेत. आशा आहे की तुम्हाला हे Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in Marathi (भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व विचार) नक्की आवडले असतील. हे प्रेरणादायी विचार आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करून महामानवास विनम्र अभिवादन करा. जय भीम! जय भारत!

Back to top button